Ad will apear here
Next
फिनलंडमध्ये इतिहास; ३४ वर्षांच्या सना मरीन पंतप्रधान
फिनलंडच्या पंतप्रधान सना मरीनफिनलंडच्या पंतप्रधानपदी अवघ्या ३४ वर्षे वयाच्या सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या सना मरीन यांची पंतप्रधानपदी निवड झाली आहे. त्या जगातल्या सर्वांत तरुण महिला पंतप्रधान ठरल्या आहेत. एवढेच नव्हे तर, त्यांच्या आघाडीत असणाऱ्या चारही पक्षांच्या प्रमुख तरुण महिला आहेत. त्यामुळे फिनलंडची सूत्रे महिलांच्या हाती गेली आहेत. याबद्दल अधिक माहिती देणारा हा लेख....
..... 
युरोपातील छोटासा देश असलेल्या फिनलंडच्या पंतप्रधानपदी अवघ्या ३४ वर्षे वयाच्या सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या सना मरीन यांची पंतप्रधानपदी निवड झाली आहे. सत्ता स्थापन करणाऱ्या पाच पक्षांच्या आघाडीत अन्य चार पक्षांच्या प्रमुखही तरुण महिलाच आहेत. या आधी युक्रेनचे ३६ वर्षीय पंतप्रधान ओलेसी होन्चेरुकू यांना सर्वांत तरुण पंतप्रधान होण्याचा मान मिळाला होता. 

फिनलंडचे मावळते पंतप्रधान एंटी रिने यांना सरकारी पोस्ट खात्याचा संप व्यवस्थित हाताळता न आल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नोव्हेंबर महिन्यात सुरू झालेला हा संप आता मिटला असला, तरी अवघे ७०० कर्मचारी असलेल्या देशाच्या पोस्ट खात्याचा हा संप सन्मान्य तोडग्याने मिटवण्यात रिने अपयशी ठरले. पोस्ट खात्याच्या कर्मचाऱ्याच्या संपाला उद्योग आणि सरकारी मालकीच्या फिना एअर या विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीही पाठिंबा दिल्याने त्याचे विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाले होते.

हा संप चिघळल्याने रिने नेतृत्व करीत असलेल्या सेंटर पार्टीचा विश्वास त्यांनी गमावला आणि त्यांना हे सत्तेचे सर्वोच्च पद सोडावे लागले. माजी कामगार नेते असलेल्या रिने यांना, कर्मचाऱ्यांच्या समस्या माहिती असतानाही त्यांनी संप मिटवण्यासाठी जलद गतीने हालचाली केल्या नसल्याचा आरोप पक्षाने त्यांच्यावर ठेवला होता. आता गेल्या एप्रिलमध्ये सत्तेवर आलेल्या सोशल डेमोक्रॅटिक, सेंटर पार्टी, डावी आघाडी आणि स्विडीश पिपल्स पार्टी या पक्षांच्या सत्ताधारी आघाडीचे आणि सरकारचे नेतृत्व सना मरीन यांच्याकडे आले आहे.


१६ नोव्हेंबर १९८५ रोजी फिनलंडची राजधानी हेलिसिंकी येथे जन्मलेल्या सना मरीन यांनी टॅम्पिअर विद्यापीठातून २०१२ मध्ये प्रशासकीय विज्ञान या विषयाची पदव्युत्तर पदवी मिळवली. हेलिसिंकी महापालिकेच्या नगरसेवकपदी त्या निवडून गेल्या होत्या. २०१५ मध्ये त्या संसद सदस्य झाल्या आणि सातच महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या आघाडी सरकारमध्ये त्या परिवहन आणि दूरसंचार खात्याच्या मंत्री झाल्या. २०० सदस्यांच्या फिनलंडच्या संसदेत चार पक्षांच्या आघाडीचे ११७ सदस्य आहेत. सरकारी कामकाजाचा फारसा अनुभव  नसला, तरी आपण जनतेच्या आशाआकांक्षांची पूर्तता करण्यासाठी पारदर्शी कारभार करू, अशी ग्वाही मरीन यांनी दिली आहे. मतदारांचा विश्वास आपण सर्वाधिक महत्त्वाचा मानत असल्याने, जनतेला आपले सरकार अधिक सोयीसुविधा देईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. आपण महिला असलो, तरी आपले सरकार स्त्री-पुरुष भेदभाव करणार नाही, सर्वांनाच विकासाची संधी देईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

उत्तर युरोपमधील अवघ्या ५४ लाख लोकसंख्येचे फिनलंड हा देश क्षेत्रफळाने आठव्या क्रमांकावर आहे. ९५ टक्के जनतेची मातृभाषा फिनीश, तर पाच टक्के जनतेची मातृभाषा स्विडीश आहे. इतिहास-काळात फिनलंड हा स्वीडनचा भाग होता. १८०९ मध्ये तो रशियन साम्राज्याचा स्वायत्त भाग झाला. नंतर हे राष्ट्र स्वतंत्र झाले. दुसऱ्या महायुद्धात रशियाने आक्रमण करून फिनलंडवर वर्चस्व प्रस्थापित केले होते. महायुद्धानंतर पुन्हा हे राष्ट्र स्वतंत्र झाले आणि १९५५ मध्ये राष्ट्रसंघाचे सदस्य झाले. १९९५मध्ये फिनलंडने युरोपियन संघाचे सदस्यत्व घेतले.

 सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि लष्करी क्षेत्रात फिनलंड हा सर्वात स्थिर आणि विकसित देश आहे. देशाची लोकसंख्या कमी तर आहेच, पण हा देश उत्तर ध्रुवाला जवळचा असल्याने येथे वर्षातले सहा महिने हिवाळाच असतो. औद्योगिक  क्षेत्रातही गेल्या काही वर्षांत या देशाने आघाडी मिळवली आहे. मोबाइल फोन निर्मितीच्या क्षेत्रात काही वर्षांपूर्वी आघाडीवर असलेली नोकिया’ ही कंपनी फिनलंडचीच होती. उत्तरेला नॉर्वे, पूर्वेला रशिया आणि स्वीडनशी सीमा भिडलेला हा देश शांततावादी आहे. आता या देशाचे नेतृत्व युवा महिलेकडे आल्याने, तिथल्या लोकशाही राज्यात नवा इतिहास नोंदला गेला आहे.

 - वासुदेव कुलकर्णी    
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZQQCH
Similar Posts
धारणा बदलताहेत.. यंदाच्या एक, दोन नाही तर पाच प्रमुख सौंदर्य स्पर्धांचं विजेतेपद कृष्णवर्णीय सौंदर्यवतींनी पटकावलं. फक्त गौर वर्ण म्हणजे सौंदर्य नाही; सौंदर्याची व्याख्या खूप वेगळ्या पद्धतीने करता येते, हे या तरुणींनी दाखवून दिलं. त्यामुळे समाजातील जुनाट धारणा आजची स्त्री बदलून टाकेल, असा विश्वास निर्माण होत आहे....
कलेने दाखवली पर्यावरण संवर्धनाची वाट केरळमधील अवघ्या २३ वर्षांच्या अपर्णा एस. हिच्या पर्यावरण संवर्धनाच्या अनोख्या उपक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. टेराकोटाचे दागिने तयार करणाऱ्या अपर्णाने आपल्या ‘क्युप्पी’ या उपक्रमाद्वारे कला आणि पर्यावरण संवर्धन याची सांगड घातली आहे. तलाव तसंच आसपासच्या परिसरात पडलेल्या बाटल्यांचं ती सुंदर कलाकृतीत रुपांतर करते
‘तिचा’ पाय गेला; पण जिद्द कायम आणि ‘ती’ झाली पदकविजेती बॅडमिंटनपटू! २३व्या वर्षी ‘तिला’ अपघातात आपला डावा पाय गमवावा लागला. लहानपणापासूनच बॅडमिंटन खेळणारी आणि नृत्य करणारी ‘ती’ निराश जरूर झाली; पण ‘तिने’ जिद्द कायम राखली. कृत्रिम पाय लावून ती कसून सराव करू लागली, खेळू लागली आणि तिने देशासाठी अनेक पदकांबरोबर सुवर्णपदकही जिंकले. मानसी गिरीशचंद्र जोशीची ही प्रेरणादायी कहाणी
ट्रान्समिशन टॉवरची राणी : सीता बेहेरा पुरुषप्रधान ठरवली गेलेली अनेक आव्हानात्मक क्षेत्रे आता महिलांनी पादाक्रांत केली आहेत. वीज पुरवठा हे असेच एक क्षेत्र. ओडिशातील सीता बेहेरा हिने या क्षेत्रात उतरून ट्रान्समिशन टॉवरची राणी असा किताब पटकावला आहे. या धाडसी सीतेची ही कहाणी...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language